संदर्भ

 १  ईर्मा ग्रीस वरील इंग्रजीतील लेख  (येथे क्लिक करा)
 २.प्रसिध्द लेखक भाउ पाध्ये ह्यांच्या विषयीचे संकेतस्थळ 
 3. नाझी कॉन्संट्रेशन कँप्स् चि्त्रफित  पहाण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
 

Nazi Concentration Camps Documentary Shotlist

Reel 1:

Army Lt. Col. George C. Stevens, Navy Lt. E. Ray Kellogg and U.S. Chief of Counsel Robert H. Jackson read exhibited affidavits which attest to authenticity of scenes in film. Map of Europe sh
ows locations of concentration camps in Austria, Belgium, Bulgaria, Czechoslovokia, Danzing, Denmark, France, Germany, Isle of Jersey, Latvia, Netherlands, Poland and Yugoslavia. At Leipsig Concentration Camp, there are piles of dead bodies, and many living Russian, Czechoslovakian, Polish and French prisoners. At Penig Concentration Camp, Hungarian women and others display wounds. Doctors treat patients and U.S. Red Cross workers move them to German Air Force hospital where their former captors are forced to care for them.

Reel 2:

At Ohrdruf Concentration Camp, inspection team composed of Allied military leaders, members of U.S. Congress and local townspeople tours camp. Among them are Generals Dwight David Eisenhower, Supreme Headquaters Allied Expeditionary Forces commander; Omar Nelson Bradley; and George S. Patten. General Eisenhower speaks with Congressmen. They see bodies heaped on grill at crematorium and Polish, Czechoslovakian, Russian, Belgian, German Jews and German political prisoners. Col. Heyden Sears, Combat Command A, 4th Armored Division commander, forces local townspeople to tour camp. U.S. officers arrive at Hadamar Concentration Camp, where Polish, Russian and German political and religious dissidents were murdered. Maj. Herman Boelke of U.S. War Crimes Investigation Team (WCIT) examines survivors. Bodies are exhumed from mass graves for examination, identification and burial. Four-man panel interviews facility director Dr. Waldman and chief male nurse Karl Wille.

Reel 3:

At Breendonck Concentration Camp, Belgium, methods of torture are demonstrated. At Harlan Concentration Camp near Hannover, U.S. Red Cross aides Polish survivors. Allied troops and able-bodied survivors bury dead. At Arnstadt Concentration Camp, German villagers are forced to exhume Polish and Russian bodies from mass graves.

Reel 4:

At Nordhausen Concentration Camp, there are piles of bodies. Troops treat, feed and remove survivors who are mainly Polish, Russian and French. At Mauthausen Concentration Camp, Navy Lt. Jack H. Taylor stands with fellow survivors and describes his capture, imprisonment and conditions at Mauthausen. Volunteers bathe victims.

Reel 5: 
At Buchenwald Concentration Camp, Army trucks arrive with aid for survivors. Piles of dead, mutilated and emaciated bodies. Some survivors among dead. Huge ovens and piles of bone ash on floor of crematorium. Civilians from nearby Weimar are forced to tour camp. They see exhibits of lampshades made of human skin, and two shrunken heads.

Reel 6:
British commander of Royal Artillery describes conditions at Bergen-Belsen Concentration Camp. German Army Schutzstaffel (SS) troops are forced to bury dead and aid survivors. Woman doctor, former prisoner, describes conditions in female section of camp. Belson commander Kramer is taken into custody. German guards bury dead. Bulldozer pushes piles of bodies into mass graves.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------


4.  पिपांत मेले ओल्या उंदिर कवितेवरी लेखामधील  इर्मा ग्रीस विषयी जी. ए. कुलकर्णी यांच्या " रात्र वैऱ्याची आहे" या पुस्तकातील संदर्भ.


   इर्मा ग्रीस

पान क्र. 90
इरमा आत येताना डौलाने कंबर झुलवत येत असे, आणि चाळीस हजार स्त्रीयांचे हताश निर्जीव डोळे तिच्यावर खिऴल्यासारखे होत. ती मध्यम उंचीची असून तिचे कपडे अतिशय नीटनेटके व किमती असत. तिचे केस देखील फार ऐटीने शृंगारलेले असत. आपण येताच सर्वत्र निर्माण होणारे भय पाहून तिला समाधान वाटत असावे असे वाटे. या बावीस वर्षाच्या तरूणीत दयेमायेचा चुकून एक थेंबसुध्दा नव्हता. आजारी कैद्यांमधून निवड  “ करताना तिचा हात कधी थरथरला नाही, की ती कधी गोंधळून गेली नाही. उपासमार, बराकीतील आयुष्याच्या यातना यांना तोंड देऊनही एखाद्या स्त्रीने आपले सौंदर्य टिकवून ठेवले असेल, तर इरमाकडून हमखास तिची प्रथम निवड होत असे. काही सनसनाटी वर्तमानपत्रांनी बेलसेनची गोरी राणी  “ असे तिचे वर्णन पसरवण्याचा प्रयत्न केला. पण खरे म्हणजे ती गोरी राणी नसुन काळदूती होती.  ती मृत्युची तळारीण होती.
कैद्यांची निवड चालू असता इरमा चाबकाचा अगदी निर्बंध उपयोग करत असे. तिच्या मनाला लहर येईल तेथे चाबकाचा फटकारा पडे, आणि झेपेल तसे आम्ही सहन करत असू. आमच्या वेदना, आतून तडकल्यासारखे काही स्त्री कैद्यांचे रडणे, अंगातून फुटणारे रक्त हे सारे पाहून तिचा चेहरा आनंदाने जास्तच उकळल्याप्रमाणे होत असे आणि ती समाधानाने हसत असे. तिचे दात कसे अत्यंत रेखीव आणि दाणेदार मोत्याप्रमाणे होते.
जून 1944 मध्ये एक दिवस अशा निवड झालेल्या तीनशे पंधरा स्त्री कैद्यांना अंघोळ कोठड्यात डांबून ठेवण्यात आले. बाहेरच्या आवारात त्यांना आधीच लाथाबुक्क्या खाव्या लागल्या होत्या. त्यांना आत कोंबल्यावर दरवाजा खिळे ठोकून बंद करण्याचा इरमाने हुकूम दिला.

पान क्र. 146 – 147
   जर्मन अधिकाऱ्यांत मला इरमा ग्राइसची चांगली ओळख पटली होती. म्हणजे तिच्याशी इतकी पहचान व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. परिस्थिती प्रमाणे ते घडत गेले, इतकेच.
मी पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा उच्चार करते, म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ती खरोखरच असामान्य सुंदर होती. तिचे सौंदर्य इतके आकर्षक होते, की ती आली म्हणजे निवड, हजेरी असल्याच भयंकर गोष्टी घडणार हे माहीती असूनही कैदी तिच्याकडे खिळलेल्या नजरेने पहात रहात आणि उदगार काढत, काय अलौकिक सौंदर्य हिला लाभले आहे ! “.  एखाद्या कादंबरीकाराने एखाद्या व्यक्तिचित्राला इतके निर्दय करून जोडीला असे सौंदर्य दिले असते, तर त्याची कल्पनाशक्ती उनाड स्वैर झाली आहे असे आपण म्हटले असते. पण काही वेळा प्रत्यक्ष जीवन कादंबरीपेक्षा जास्त भीषण, जास्त अतर्क्य ठरते. बावीस वर्षाच्या या तरूणीला आपल्या रूपाची पूर्ण जाणीव होती, आणि ते जास्तच उत्तान करण्याची एकही संधी ती वाया घालवत नसे. तिचे तासनतास आरशासमोर जात. त्या वेळी प्रसाधन करणे हा काही तिचा एकच हेतू नसे, तर आरशात पहात अनेक लाडीक हावभावांची सवय करत ते अंगवळणी पाडायचा ते प्रयत्न करत असे. ती जेथे जात असे त्या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ व उत्कट अत्तराचा वास दरवळत असे. तिच्या केसांनाही मन भुलविणारे अनेक गंध असत. अत्तराचा अती वापर हेदेखील तिच्या निर्दयपणाचेच एक कुशल रूप होते. स्वच्छतेची कसली साधने नसल्यामुळे जवळजवळ गटारघाणीतच रहाणाऱ्या बायका त्या सुवासाने धुंद होत. पण ती निघून गेली की पुन्हा एकदा मांस जळत असताना येणारा कुंद, दाट वास अदृष्य घाणेरड्या जाजमाप्रमाणे आमच्यावर येउन आदळत असे. मधल्या सुगंधी अनभुवामुळे आता तो जास्तच असह्य होत असे. सोनेरी केसाची ही अत्यंत देखणी कृत्या आपले सौंदर्य सुध्दा आमच्या भयानक स्थितीची आम्हाला कठोर जाणीव करून देण्यासाठीच वापरत असे.
तिचे कपडेदेखील भारी किमतीचे व सुबक असत, इतकेच नव्हे तर तिचा गणवेषच इतर कपड्यांपेक्षा जास्त डौलदार दिसे. विशेषतः तिचे तिच्या डोळ्यांच्याच रंगाचे एक निळे जाकीट होते.  ते घातल्यावर तर ती एखाद्या चित्राप्रमाणे दिसे. त्यावर ती जास्त गडद रंगाचा टाय बांधत असे. वेळोवेळी वापरला जाणारा तिचा चाबूक तिच्या उंच बूटात एका पिंडरीवर खोचलेला असे.

पान क्र. 148
अशा चैनी आणि सुदर बयेच्या बऱ्याच भानगडी असणारच. क्रेमर व डॉ. मेंगले हे तिचे मुख्य प्रियकर होते, असा आमच्या छावणीमध्ये प्रवाद होता. परंतु तिचे सर्वात जिव्हाऴ्याचे प्रेमप्रकरण एका जर्मन इंजिनियरशी होते. ती त्याला दररोज संध्याकाळी भेटत असे. ठरल्या वेळी भेटता यावे म्हणून ती रात्रीच परत येत असे. ती ज्या वेळी त्याच्याबरोबर असे, तेव्हा ती मोठ्या ताठ्याने आमच्याकडे पहात असे. ती जणू  म्हणत असे, पहा  ! हे माझे साम्राज्य आहे. तुमच्या कळपातल्या प्रत्येकीच जीवनमरण मी माझ्या बोटाच्या एका इशाऱ्यानं ठरवू शकते.  “

पान क्र. 185

मग इरमाने आम्हाला आत येण्यास फर्मावले.
ती अस्वस्थ दिसत होती. ब्लाउजची बटने लावत ती वेड्याप्रमाणे हसली व म्हणाली , “  आता घालूनच पाहू हे कपडे  ! “
मग कपडेवालीने तिला कपडे दिले. उरलेले कपडे हातावर घेऊन बाजूलाचा मी उभी होते व तिची नजर चुकवत होते.
हे तिचे कपडे घालून पहाण्याचे काम मात्र थरार आणणारे होते. मी त्या रूपवान राक्षशिणीला नग्ऩ रूपात पहात होते. प्रथम तिच्या अंगावर केवळ एक तोकडे वस्त्र होते. पण दुसरा एक कपडा अंगावर चढवून पहाण्याच्या वेळी तिने अगदी निःसंकोचपणे ते काढून बाजूला टाकले. आमच्यासमोर संकोच किंवा लाज दाखवायला आम्ही माणसे अशी उरलोच नव्हतो. नवे शिवलेले अंतर्वस्त्र छातीला थोडे
आवळ झाले होते. ते तिने टर्रदिशी अंगावरून ओरबाडून काढले व कपडेवालीच्या तोंडावर फेकून म्हटले,
“  उद्या सकाळच्या आत दुरूस्त करून आण !“
ती अगदी भेदरून म्हणाली, उद्या सकाळपर्यंत कसं  होणार  ?  रात्री माझ्याकडे दिवा नाही.
तेव्हा नग्नपणेच इरमा झ्रर्रदिशी वऴली व तिने कापडवालीला थडाथड दोन जोरदार थपडा दिल्या. मला तर श्वास घेण्याचीदेखील भिती वाटू लागली. असा वादळी संताप इतक्या सुस्वरूप शरीरात असू शकतो का ?
पण नंतर काही घडलेच नाही अशा तऱ्हेने तिने बाकीचे कपडे अंगावर चढवून पाहिले. मग तिने आळस देत जाभई दिली व कंटाळत म्हटले , जा चालती हो इथून   !
आम्ही निघालो तेव्हा तिच्या अंगावर लेस असलेले एकच वस्त्र होते. तिच्या गौरवर्णामुळे त्यातील विणकाम फार उठावदार दिसत होते. ती अंगाने तशी चांगली भरदार होती. फार तिचे स्तन त्या मानाने फार मोठे होते. तिचे पायदेखील बेढब, जाडजूड होते. बूट न घातलेले तिचे उघडे पाय मी प्रथमच पहात होते.
तिच्या रूपात असला काहीतरी दोष आहे याचा मला खरच आनंद वाटला. नाहीतर त्या सौंदर्यवतीला आपल्या लावण्ण्याचा केवढा दिमाख होता !